हनुमान जयंतीनिमित्त वेंगुर्ल्यात रंगली पॉवरलिफ्टिंग स्पर्धा; खेळाडूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद
वेंगुर्ले
येथील नाईक जिम अँड फिटनेस सेंटर येथे हनुमान जयंतीचे औचित्य साधून जिम मर्यादित पॉवरलिफ्टिंग स्पर्धेचे उत्साहात आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांच्या हस्ते करण्यात आले, तर श्री देव हनुमान यांच्या मूर्तीचे पूजन नगरसेविका मयुरी केरकर यांनी केले. यावेळी व्यायाम आणि खेळाडूंच्या कौशल्याला प्रोत्साहन देण्यासाठी मान्यवरांनी उपस्थिती लावली होती.याप्रसंगी प्रदीप वेंगुर्लेकर, गोपाल नार्वेकर, अमित नाईक, ईश्वर माने, डॉ. सचिन भांडे, दीपाली नाईक, राहुल मोर्डेकर, विशाल चेंदवणकर, अवधूत नाईक, सोहम पेडणेकर, किरण मेस्त्री, उज्ज्वल गडेकर, जयेश गावडे, पार्थ वेंगुर्लेकर, राजन प्रजापती, निहार नवार, साईराज मातोंडकर आदी मान्यवर व क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हनुमान जयंतीनिमित्त आयोजित या स्पर्धेमुळे जिममधील खेळाडूंना आपले सामर्थ्य सिद्ध करण्याची संधी मिळाली.
konkansamwad 
