किशोर सोन्सूरकर यांची 'भारत श्री' राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेसाठी पंच म्हणून निवड

किशोर सोन्सूरकर यांची 'भारत श्री' राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेसाठी पंच म्हणून निवड

 

वेंगुर्ले

 

   पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड येथे होणार्‍या सिनियर आणि ६३ व्या जुनिअर नॅशनल बॉडी बिल्डिंग चॅम्पियनशिप स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या अत्यंत मानाच्या राष्ट्रीय स्तरावरील 'भारत श्री' स्पर्धेसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले येथील आंतरराष्ट्रीय पंच किशोर शांताराम सोन्सूरकर यांची निवड झाली आहे. आयबीबीएफएफचे जनरल सेक्रेटरी डॉ. संजय मोरे यांनी ही निवड जाहीर केली. किशोर सोन्सूरकर हे दाभोली इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक असून सिंधुदुर्ग जिल्हा बॉडी बिल्डर असोसिएशनचे सचिव म्हणूनही कार्यरत आहेत. गेल्या ४० वर्षापासून ते व्यायाम क्षेत्रात सक्रिय असून त्यांनी स्वतः एक उत्तम खेळाडू म्हणून कारकीर्द गाजवली आहे. यापूर्वी त्यांनी अनेक जिल्हा, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये पंच म्हणून यशस्वी कामगिरी केली आहे. त्यांच्या या निवडीमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.