१२० किमी वेगाने आलेल्या नॉरईस्टर वादळाने अमेरिकेत हाहाकार, ९ लाख घरांची वीज गेली, ४०० उड्डाणे रद्द

१२० किमी वेगाने आलेल्या नॉरईस्टर वादळाने अमेरिकेत हाहाकार,  ९ लाख घरांची वीज गेली, ४०० उड्डाणे रद्द

अमेरिका

 

    अमेरिकेत भयानक वादळाने तांडव घातले आहे. 120 किमी वेगाने आलेल्या नॉरईस्टर वादळामुळे सर्वत्र हाहाकार उडाला आहे. प्रचंड वेगाने वाहणारे वारे आणि मुसळधार पावसाचा लाखो नागरिकांना फटका बसला आहे.वादळामुळे झाडे उन्मळून पडली आहेत. विजेचे खांब उलथल्याने सर्वत्र अंधार पसरला आहे. त्यामुळे थँक्सगिव्हिंग सारखा सणही नागरिकांना साजरा करता आला नाही. 100 वर्षात पहिल्यांदाच असे घडले आहे. देशाच्या मध्य आणि पूर्वेकडील भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.चक्रीवादळामुळे अमेरिकेतील 9 लाखाहून अधिक घरे आणि व्यावसायिक प्रतिष्ठानांची बत्ती गुल झाली आहे. तब्बल 400 उड्डाणे रद्द करण्यात आल्याने प्रवाशांची चांगलीच फरफट झाली आहे. सर्वाधिक आश्चर्यकारक बाब म्हणजे, प्रसिद्ध मॅसिज थँक्सगिव्हिंग डे परेड पहिल्यांदा रद्द करण्यात आली आहे. या परेडच्या 100 वर्षाच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडले आहे. वादळी वारे आणि अतिवृष्टीमुळे आयोजकांनी ही परेड स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.