स्वतः सुरक्षित राहा आणि देशही सुरक्षित ठेवा ....छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिरात विद्यार्थ्यांना पोलिसांचे मोलाचे मार्गदर्शन
फोंडा
आजच्या धावपळीच्या जीवनात विद्यार्थ्यांनी स्वतः सुरक्षित राहून देश सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी घ्यावी. रस्त्यावरील प्रवासातील सुरक्षितता, ऑनलाईन फसवणूक, मुला-मुलींची होणारी फसवणूक टाळण्यासाठी विद्यार्थ्यांनी कुटुंबालाच नव्हे तर स्वतः लक्ष देणे गरजेचे आहे, असे आवाहन पोलीस उपनिरीक्षक श्री. जयराम पाटील यांनी केले.फोंडा ज्युनियर कॉलेज येथे छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिरानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, आधुनिक युगात विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमावर लक्ष केंद्रित करून विविध स्पर्धा परीक्षा देऊन यश प्राप्त करावे.या कार्यक्रमात PSI श्री. फाळे यांनी महिलांनी घ्यावयाची दक्षता आणि समाजात कोणत्याही फसव्या आमिषाला बळी पडू नये याबत मार्गदर्शन केले. तसेच स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासक्रमाबाबत विद्यार्थ्यांना उपयुक्त सूचना दिल्या.सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्री. प्रकाश गवस यांनी विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनातील शिस्तीचे महत्त्व अधोरेखित केले. वाहतुकीचे नियम पाळणे, जनजागृती करणे आणि मोटार सायकल चालवताना स्टंटबाजी टाळणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. "एखादा विद्यार्थी अपघातात गेल्यास त्याचा मित्र परिवार, आई-वडील आणि संपूर्ण कुटुंबाची वाताहात होते. अतिवेग हा अनेकदा मृत्यूस कारणीभूत ठरतो. त्यामुळे वेगावर नियंत्रण ठेवून वाहने चालवा" असे आवाहन त्यांनी केले.कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुख्याध्यापक श्री. प्रसाद पारकर आणि विद्यार्थ्यांनी मान्यवरांचे स्वागत केले. विद्यार्थ्यांनी केलेली जनजागृती समाजासाठी मोलाची ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
konkansamwad 
