गव्याची पर्यटकांच्या गाडीला जोरदार धडक
सावंतवाडी
गोवा येथे पर्यटनासाठी गेलेल्या रत्नागिरीतील पर्यटकांच्या गाडीला न्हावेली येथे गव्याची जोरदार धडक बसली. या अपघातात त्यांच्या गाडीच्या दर्शनी भागाचे फार मोठे नुकसान झाले. मात्र, सुदैवाने चालक तसेच गाडीतील अन्य कुटुंबीयांना कोणतीही इजा झाली नाही. याबाबत तेथूनच शिरोड्याच्या दिशेने जाणारे कारचालक सुधाकर रेडकर यांनी वनविभागाला माहिती दिली असून वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी रवाना झाले आहेत.
konkansamwad 
