सावंतवाडीत कळसुलकर ते निंबाळकर पीर नाला बंदिस्त कामाचे भूमिपूजन....नागरिकांना मिळणार दिलासा
सावंतवाडी
सावंतवाडी नगरपरिषद हद्दीतील कळसुलकर हायस्कूल ते निंबाळकर पीरकडे जाणारा नाला बंदिस्त करण्याच्या महत्त्वाच्या विकासकामाचा भूमिपूजन समारंभ नगराध्यक्षांच्या शुभहस्ते संपन्न झाला. परिसरातील नागरिकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी हा नाला बंदिस्त करणे अत्यंत गरजेचे झाले होते. पावसाळ्यात आणि इतर वेळी उद्भवणाऱ्या समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा निघावा आणि परिसर स्वच्छ व सुरक्षित राहावा, या उद्देशाने या विकासकामाला गती देण्यात आली आहे. नगराध्यक्षांच्या हस्ते विधीवत पूजा करून या कामाचा शुभारंभ करण्यात आला. या भूमिपूजन प्रसंगी आरोग्य सभापती सुधीर आडीवरेकर, नियोजन सभापती आनंद नेवगी, महिला व बालकल्याण सभापती दिपाली भालेकर, प्रतीक बांदेकर, दुलारी रांगणेकर, शर्वरी धारगळकर, सिद्धार्थ भांबुरे आदी नगरसेवक नगरपरिषदेचे अधिकारी तसेच सर्व कर्मचारी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी या कामामुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.
konkansamwad 
