तुळसच्या विद्यार्थ्यांनी इंग्रजीतून स्वरचित कविता लिहून केले शाळेचे नाव उज्ज्वल.....श्री शिवाजी हायस्कूल तुळस येथील इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांचा उल्लेखनीय उपक्रम

तुळसच्या विद्यार्थ्यांनी इंग्रजीतून स्वरचित कविता लिहून केले शाळेचे नाव उज्ज्वल.....श्री शिवाजी हायस्कूल तुळस येथील इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांचा उल्लेखनीय उपक्रम

तुळस 


     राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार तसेच शिक्षक क्षमतावृद्धी प्रशिक्षण 2.0 यात दिलेल्या माहितीनुसार प्रवाह, पर्वत व आकाश या विद्यार्थ्यांच्या तीन पातळ्या आहेत. त्यातील आकाश पातळी ही सर्वात उच्चतम पातळी मानली जाते. या पातळीवरील विद्यार्थी विषयाच्या सीमांच्या पलीकडे जातात. ते स्वतःच्या कल्पना मांडतात, नवनिर्मिती करतात आणि सर्जनशीलता दाखवतात.श्री शिवाजी हायस्कूल तुळस चे विद्यार्थी आता आकाश पातळीपर्यंत पोहोचले आहेत. दिलेल्या फ्रेमवर्क वर आधारित स्वतः इंग्रजी सारख्या भाषेतून कविता लिहिणे हे आकाश पातळीच्या विद्यार्थ्यांचे उत्तम उदाहरण असून तुळसच्या विद्यार्थ्यांनी अशा उत्कृष्ट कविता लिहिल्या आहेत.श्री शिवाजी हायस्कूल तुळस येथे कार्यरत असणाऱ्या शिक्षिका श्रीम. सोनाली प्रेमप्रकाश नाईक यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी Simile, Metaphor, Personification या अलंकारावर आधारित कविता लिहिल्या आहेत. इयत्ता 7 वीच्या वर्गाला विविध अलंकारावर आधारित कविता इंग्रजी भाषेतून लिहिण्याचे आव्हान देण्यात आले होते.सान्वी मंगेश चुडजी, खुशी चंद्रशेखर मांजरेकर, आराध्या भगवान मांजरेकर, प्रार्थना शंकर माळकर, मानवी सखाराम आमचेकर, भार्गवी विष्णू परुळकर, सानिका सचिन पांगम, सिया भिकाजी कोचरेकर, स्वरा शंकर घारे, झिलू दिलीप परब, वेदांत सचिन राऊळ, सुरज प्रताप गोळम, आर्यन सुभाष ठुंबरे या इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी अतिशय उत्कृष्ट इंग्रजी मधून स्वरचित कविता लिहिल्या.या विद्यार्थ्यांचे शाळेचे मुख्याध्यापक श्री कोल्हे सर, तुळसचे केंद्रप्रमुख हिरेमठ साहेब यांनी कौतुक केले. विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला वाव मिळावा यासाठी शाळेकडून सातत्याने प्रोत्साहन दिले जात आहे.विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल शाळा समिती, शाळा व्यवस्थापन समिती, तुळस श्रीदेव जैतिराश्रित संस्था, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, मुख्याध्यापक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, आजी-माजी विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थ यांच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले. श्री शिवाजी हायस्कूल तुळसच्या या विद्यार्थ्यांनी शाळेचे नाव उज्ज्वल करावे अशा शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.