आजगाव मळेवाड मार्गावर अपघात; सुदैवाने जीवितहानी नाही
वेंगुर्ला
वेंगुर्ला तालुक्यातील आजगाव मळेवाड येथील राजगड रिसॉर्टच्या बाजूला आज सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास अपघाताची घटना घडली. या अपघातात सिद्धेश परब यांच्या एर्टिगा कारचे नुकसान झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सिद्धेश परब हे आपल्या आईसह एर्टिगा कारने गोवा येथे जात होते. त्याचवेळी शिरोडा येथे भाजी विक्रीसाठी जाणारा भाजी विक्रेता दुचाकीवरून जात असताना अचानक रस्त्यावर झाडाची फांदी आडवी आल्याने त्यांच्या गाडीवरील नियंत्रण सुटले आणि त्यांची दुचाकी थेट परब यांच्या कारला धडकली.
या धडकेत एर्टिगा कारच्या एका बाजूचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही मोठी जीवितहानी झाली नाही. घटनेची माहिती मिळताच वेंगुर्ला युवक काँग्रेसचे अध्यक्ष प्रथमेश उर्फ बंड्या परब, जिल्हा परिषद सदस्या सुधा कवठणकर आणि स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली.
दरम्यान, वेंगुर्ला-गोवा हा वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मार्ग असून रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या झाडांच्या फांद्या तातडीने छाटण्यात याव्यात, अशी जोरदार मागणी वाहनधारकांकडून होत आहे.
konkansamwad 
