ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेसाठी विद्यार्थ्यांनी अर्ज करावेत
सिंधुदुर्ग
इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील भटक्या जमाती (क) प्रवर्गातील धनगर समाजाचे विद्यार्थी वगळून, उच्च शिक्षण घेणाऱ्या आणि शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या पात्र विद्यार्थ्यांसाठी ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना’ राबविण्यास शासनाने मान्यता दिली आहे.सन 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी बारावीनंतर पदवी, पदव्युत्तर तसेच व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या पात्र विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.या योजनेसाठी दि. 12 ऑगस्ट 2026 पासून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पात्र विद्यार्थ्यांनी https://hmasnew.mahait.org/ या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करावा. अर्ज भरल्यानंतर आवश्यक कागदपत्रांसह अर्जाची एक प्रत सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, सिंधुदुर्ग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सिंधुदुर्गनगरी, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग येथे जमा करावी.पात्र विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज करावा, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याणचे सहाय्यक संचालक उदयसिंह गायकवाड यांनी केले आहे.
konkansamwad 
