शिवसेनेची विधानसभा आढावा बैठक संपन्न.

सिंधुदुर्ग.
शिवसेना शिवसंपर्क अभियानाचा आढावा शिवसेना रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा संपर्क प्रमुख रविंद्र फाटक यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाप्रमुख संजय आंग्रे, शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावसकर यांच्या नेतृत्वाखाली कणकवली विधानसभा, कुडाळ मालवण विधानसभा आढावा बैठक पार पडली या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून १०.००० लोकांना घेऊन जाण्याचे नियोजन यावेळी पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून करण्यात आले व पक्ष संघटना वाढी संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी उपस्थित शिवसेना तालुकाप्रमुख व तालुक्यातील पदाधिकारी कार्यकर्ते यांना लोकसभा संपर्क प्रमुख रवींद्र फाटक यांनी पदाधिकऱ्यांना सूचना दिल्या.