एनडीआरएफच्या निकषांपलीकडे मदत देण्यास सरकार तयार-नितेश राणेंची....कोकणातील आंबा-काजू उत्पादकांना मिळणार दिलासा.

एनडीआरएफच्या निकषांपलीकडे मदत देण्यास सरकार तयार-नितेश राणेंची....कोकणातील आंबा-काजू उत्पादकांना मिळणार दिलासा.

कणकवली

 

     कोकणातील आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांचे यंदा सुमारे ९० टक्क्यांपर्यंत मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त बागायतदारांना एनडीआरएफच्या निकषांपलीकडे जाऊन विशेष आर्थिक मदत देण्याची राज्य सरकारची तयारी असल्याची ग्वाही सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी विधानसभेत दिली. आमदार निलेश राणे आणि इतर आमदारांनी कोकणातील आंबा-काजू नुकसानीचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर बोलताना पालकमंत्री नितेश राणे यांनी सांगितले की, यंदा आंबा आणि काजू पिकांचे ९० टक्क्यांपर्यंत नुकसान झाल्याच्या माहितीला शासनाने पुष्टी दिली आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक विशेष बैठकही घेतली आहे. राज्य सरकार या प्रकरणाकडे एक 'विशेष बाब' म्हणून पाहत असून, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना यापूर्वी कधी मिळाली नसेल इतकी मोठी मदत देण्याचा सरकारचा प्रयत्न राहील, असे आश्वासन पालकमंत्र्यांनी सभागृहात दिले. सरकारच्या या सकारात्मक भूमिकेमुळे कोकणातील हजारो आंबा व काजू बागायतदारांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.