पालकमंत्री नितेश राणे रविवार १४ जून रोजी सिंधुदुर्ग दौऱ्यावर....जनतेच्या घेणार गाठीभेटी  

पालकमंत्री नितेश राणे रविवार १४ जून रोजी सिंधुदुर्ग दौऱ्यावर....जनतेच्या घेणार गाठीभेटी  

कणकवली


      राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे हे रविवार 14 जून 2026 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत.  दौऱ्यादरम्यान ते जिल्ह्यातील नियोजित असलेल्या विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. यावेळी कणकवली येथील ओमगणेश निवासस्थानी पालकमंत्री नितेश राणे हे जिल्ह्यातील नागरिकांच्या गाठीभेटी घेऊन त्यांच्या समस्या व प्रश्न जाणून घेणार आहेत.पालकमंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर जिल्ह्याच्या विकासकामांचा आढावा घेण्यासाठी व स्थानिक जनतेशी संवाद साधण्यासाठी त्यांचा हा दौरा आयोजित करण्यात आला आहे. या दौऱ्यादरम्यान ते जिल्ह्यातील विविध विकास प्रकल्पांची पाहणी करणार असल्याची माहिती आहे.