तालुकास्तरीय बालवैज्ञानिक प्रदर्शन परुळे येथे २७ व २८ नोव्हेंबर रोजी.....विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक कल्पकतेला मिळणार व्यासपीठ

तालुकास्तरीय बालवैज्ञानिक प्रदर्शन परुळे येथे २७ व २८ नोव्हेंबर रोजी.....विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक कल्पकतेला मिळणार व्यासपीठ

वेंगुर्ला


        जिल्हा परिषद सिंधुदुर्ग व पंचायत समिती वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 54 वे वेंगुर्ला तालुकास्तरीय बालवैज्ञानिक प्रदर्शन सन 2026 27 शुक्रवार दि 27 व शनिवार दि 28 नोव्हेंबर रोजी अण्णासाहेब देसाई विद्यामंदिर, परुळे येथे आयोजित करण्यात आले आहे.या प्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवार दि 27 नोव्हेंबर रोजी दुपारी 2 वाजता आमदार मा दीपक केसरकर यांच्या शुभहस्ते होणार आहे. यावेळी सभापती शंकर घारे यांच्या अध्यक्षतेखाली व विशेष अतिथी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, उपाध्यक्ष दादा साईल, सभापती शिक्षण व आरोग्य प्रितेश राऊळ, उपसभापती सचिन देसाई व मान्यवर, शिक्षण विभागातील अधिकारी, शिक्षक व शिक्षणप्रेमी उपस्थित राहणार आहेत.प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी सकाळी 10 30 वाजता निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, प्राथमिक गटातील प्रश्नमंजुषा तसेच प्राथमिक व माध्यमिक गटातील प्रातिकृती मांडणी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. दुपारी 2 वाजता उद्घाटन सोहळा पार पडणार आहे.शनिवार दि 28 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता प्राथमिक व माध्यमिक गटातील प्रातिकृती परीक्षण, सकाळी 10 30 वाजता माध्यमिक गटातील प्रश्नमंजुषा स्पर्धा, तर दुपारी 3 वाजता पारितोषिक वितरण व समारोप समारंभ होणार आहे.या बालवैज्ञानिक प्रदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमधील वैज्ञानिक दृष्टिकोन, संशोधनवृत्ती, कल्पकता, निरीक्षण क्षमता व नवोन्मेषी विचारांना चालना मिळणार आहे. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वैज्ञानिक प्रतिकृती व प्रयोगांच्या माध्यमातून विज्ञानाची व्यावहारिक माहिती आणि ज्ञान समाजासमोर मांडण्याची संधी मिळणार आहे.या कार्यक्रमास शिक्षण विभागातील सर्व विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधी, विज्ञान मंडळाचे पदाधिकारी व सदस्यांनी उपस्थित राहावे, असे आयोजकांनी आवाहन केले आहे.