रंबल स्ट्रिप्स काढा, अन्यथा १४ डिसेंबरपासून आमरण उपोषण....वेंगुर्लेतील वाहन संघटना आक्रमक

रंबल स्ट्रिप्स काढा, अन्यथा १४ डिसेंबरपासून आमरण उपोषण....वेंगुर्लेतील वाहन संघटना आक्रमक

वेंगुर्ला

 

    वेंगुर्ला शहर व तालुक्यातील सार्वजनिक रस्त्यांवर बसविण्यात आलेले नियमबाह्य रंबल स्ट्रिप्स तात्काळ काढून टाकावेत, अशी मागणी वेंगुर्ला रिक्षा संघटना, दुचाकी वाहनचालक, जागृत नागरिक व महिला यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निवेदनाद्वारे केली आहे.रंबल स्ट्रिप्स बसविताना शासनाचे नियम, तांत्रिक निकष व वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा विचार केला नसल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. माहितीच्या अधिकारात मिळालेली माहिती प्रत्यक्ष परिस्थितीशी विसंगत असल्याचेही म्हटले आहे.आमदार तथा माजी मंत्री मा दीपक केसरकर यांनी आमसभेत हे रंबल स्ट्रिप्स काढण्याच्या सूचना दिल्या होत्या, मात्र अद्याप अंमलबजावणी झाली नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.या रंबल स्ट्रिप्समुळे रिक्षा व दुचाकींचे नुकसान होत असून गर्भवती महिला, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले व आजारी व्यक्तींना त्रास सहन करावा लागत आहे. दुचाकींचे संतुलन बिघडून अपघाताची भीतीही व्यक्त करण्यात आली आहे.ज्या ठिकाणी गतिरोधक आवश्यक आहेत तिथे नियमानुसार डांबरी गतिरोधक बसवावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.निवेदन मिळाल्यापासून 15 दिवसांत कार्यवाही न झाल्यास 14 12 2026 रोजी सकाळी 10 00 वाजता उभादांडा सार्वजनिक रस्त्यावर बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.