कुडाळ एस टी आगारातील ५ बसेसचे आमदार निलेश राणे यांच्या हस्ते लोकार्पण.

कुडाळ एस टी आगारातील ५ बसेसचे आमदार निलेश राणे यांच्या हस्ते लोकार्पण.


      

कुडाळ

 

   कुडाळ एस.टी.आगारासाठी कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या पाठपुराव्यानंतर महायुती सरकारमार्फत मंजूर झालेल्या ५ नवीन एस.टी. बसेसचे(लालपरी)लोकार्पण करण्यात आल्या. या नव्या बसेसमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रवाशांना अधिक सुविधा, वेळेत सेवा आणि सुरक्षित प्रवास मिळेल. लोकांच्या सेवेसाठी झटणाऱ्या परिवहन कर्मचाऱ्यांनाही ही भर घडवणारी ठरेल. याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, उपनेते संजय आग्रे, दादा साईल, दीपक नारकर, विनायक राणे, निलेश तेंडुलकर, यंत्र अभियंता सिंधुदुर्ग सुजित डोंगरे, आगार प्रमुख रोहित नाईक, महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.