आंबोली मार्गावर दाणोली येथे मालवाहतूक ट्रक पलटी

आंबोली मार्गावर दाणोली येथे मालवाहतूक ट्रक पलटी

सावंतवाडी


     आंबोली मार्गावर दाणोली येथे मालवाहतूक करणारा ट्रक पलटी झाल्याची घटना घडली. या भीषण अपघातामुळे मार्गावरील वाहतूक काही काळासाठी पूर्णपणे विस्कळीत झाली होती. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र ट्रकचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.ट्रक रस्त्याच्या मधोमध पलटी झाल्याने दोन्ही बाजूची वाहतूक थांबली होती. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने परिस्थिती नियंत्रणात आणली असून रस्ता मोकळा करून वाहतूक सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले. या अपघाताचा अधिक तपास पोलीस करत आहेत.