वेंगुर्ल्यात भाजपाची आत्मनिर्भर अभियान कार्यशाळा संपन्न
वेंगुर्ला
आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेला गती देण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्यावतीने आत्मनिर्भर अभियान मंडल कार्यशाळा वेंगुर्ला भाजप कार्यालयात पार पडली.
या कार्यशाळेला जिल्हा बँक अध्यक्ष मान. मनीष दळवी, तालुकाध्यक्ष विष्णू परब, प्रदेश निमंत्रीत शरद चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
जिल्हा उपाध्यक्ष सुषमा प्रभुखानोलकर यांनी आत्मनिर्भर अभियानाची संकल्पना प्रभावीपणे मांडत सर्वांना स्वदेशी वस्तूंच्या वापराचे आव्हान केले. उपस्थित पदाधिकाऱ्यांकडून आत्मनिर्भर संकल्प पत्रके भरून घेण्यात आली.
या कार्यशाळेला जिल्हा व तालुका पदाधिकारी, महिला व युवा मोर्चा पदाधिकारी, शक्ती केंद्रप्रमुख, सरपंच, उपसरपंच, नगरसेवक व कार्यकर्त्यांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली.

konkansamwad 
