तुळस येथे गोवर्धन मंदिर परिसरात वनराई बंधारा; जलसंधारणासह वन्यजीव संवर्धनालाही चालना

तुळस येथे गोवर्धन मंदिर परिसरात वनराई बंधारा; जलसंधारणासह वन्यजीव संवर्धनालाही चालना

वेंगुर्ला

 

     भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या आदेशानुसार व पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली, विशाल परब व तुळस ग्रामपंचायतीच्या सहकार्याने वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग-तुळस यांच्या पुढाकारातून श्री गोवर्धन मंदिर परिसरात वनराई बंधारा उभारण्यात आला.‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे पावसाचे वाहून जाणारे पाणी अडवून त्याचा साठा करण्यासोबतच भूजल पुनर्भरणास चालना मिळणार आहे. तसेच परिसरातील वन्यप्राणी व पाळीव जनावरांसाठी पाण्याचा आधार निर्माण होणार आहे.पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात वाहून जाणारे पाणी स्थानिक पातळीवर अडवून जमिनीत मुरविणे हा या बंधाऱ्याचा प्रमुख उद्देश आहे. त्यामुळे परिसरातील विहिरी, जलस्रोत तसेच भूजल पातळी वाढण्यास मदत होऊन आगामी उन्हाळ्यात पाण्याची उपलब्धता टिकवून ठेवण्यास हातभार लागणार आहे.तुळस येथील या पाणीसाठ्याचा वन्यप्राणी व पाळीव जनावरांना लाभ होणार असून उन्हाळ्यात पाण्याच्या शोधात वन्यप्राणी मानवी वस्तीकडे येण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी त्यांच्या अधिवासाजवळच पाणी उपलब्ध करणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे जलसंधारणासोबतच वन्यजीव संवर्धनाच्या दृष्टीनेही या उपक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्न देसाई, पंचायत समिती सभापती शंकर घारे, उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर, जिल्हा परिषद सदस्या सुजाता पडवळ, तुळस सरपंच रश्मी परब, उपसरपंच नारायण कुंभार, सदस्य जयवंत तुळसकर, सचिन नाईक, सदस्या चरित्रा परब, रतन कबरे, शिक्षक बबन घोडे पाटील उपस्थित होते.तसेच वेताळ प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. सचिन परुळकर, सचिव विवेक तिरोडकर यांच्यासह नाना राऊळ, महेश राऊळ, माधव तुळसकर, यशवंत राऊळ, निलेश राऊळ, रोहन राऊळ, प्रसाद भणगे, नाना सावळ, प्रदीप सावंत, संदीप गावडे, सद्गुरू सावंत, सुधीर चुडजी, मंगेश सावंत, सुहास सावंत, सागर सावंत, प्रदीप परुळकर, प्रज्वल परुळकर, प्रमोद तांबोसकर, आनंद राऊळ, रोहित गडेकर, भूमी परुळकर, भार्गवी परुळकर तसेच उद्यानविद्या महाविद्यालय, मुळदे येथील रावे ग्रुप तुळसचे ओम कुंभार, अरिन मोंडे, धनंजय साळवी, सिद्धार्थ चौधरी, यशराज पाटील, अमित टोकसिया व दिनेश बिश्नोई यांनी श्रमदान केले.