रेडी येथील द्विभुज गणपतीचा ५० वा वर्धापन दिन सोहळा १८ एप्रिल रोजी.....विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन.

रेडी येथील द्विभुज गणपतीचा ५० वा वर्धापन दिन सोहळा १८ एप्रिल रोजी.....विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन.

 

रेडी

 

    कोकणातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या रेडी येथील श्री देव गजानन देवस्थानचा ५० वा वाढदिवस (वर्धापन दिन) सोहळा येत्या शनिवार, दिनांक १८ एप्रिल २०२६ रोजी मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. यानिमित्त रेडी-नागोळेवाडी येथील मंदिरात श्री सत्यविनायक महापूजा, महाप्रसाद आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची जय्यत तयारी करण्यात आली आहे. उत्सवाची सुरुवात शनिवारी पहाटेपासून होणार आहे. सकाळी ६:०० वा. श्रींचा अभिषेक, ८:०० वा. श्री सत्यविनायक महापूजा, दुपारी १२:३० वा. भव्य महाआरती, १२:४५ वा. तीर्थप्रसाद वितरण, १:०० ते ५:०० पर्यंत भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. धार्मिक विधींसोबतच भाविकांच्या मनोरंजनासाठी दुपारी आणि रात्री खास कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी ३:०० ते ५:०० पर्यंत स्थानिक भजने, सायंकाळी ५:०० वा. श्री गणेश माउली संगीत ग्रुप प्रस्तुत 'स्वर गणेश' हा सुरेल संगीताचा कार्यक्रम, रात्री ८:३० वा. कोकणची लोककला असलेले नाईक मोचेमाडकर दशावतार नाट्य मंडळाचे भव्य दशावतारी नाटक सादर होईल.श्री देव गजानन देवस्थान ट्रस्ट, रेडी यांच्या वतीने या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. रेडीच्या या जागृत गणपतीचा ५० वा वर्धापन दिन सोहळा हा समस्त भाविकांसाठी आनंदाचा क्षण आहे. तरी सर्व भाविकांनी सहकुटुंब, सहपरिवार उपस्थित राहून दर्शनाचा आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन देवस्थान ट्रस्ट आणि नागोळेवाडी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.