विश्व संस्कृती आणि पर्यावरण संरक्षण आयोगाकडून डॉ. दिनेश नागवेकर यांचा सन्मान
सावंतवाडी
येथील सनदी अभियंता, राणी पार्वती देवी ज्युनि. कॉलेजचे स्थापत्य अभियांत्रिकी व्यावसायिक अभ्यासक्रमाचे निवृत्त शिक्षक, स्थावर संपदा विकासक आणि सावंतवाडीतील शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. दिनेश नागवेकर यांना विश्व संस्कृती आणि पर्यावरण संरक्षण आयोगाकडून राष्ट्रीय सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.तसेच आयोगाकडून अभियांत्रिकी आणि स्थावर संपदा विषयात मानद डॉक्टरेट पदवी डॉ. नागवेकर यांना प्रदान करण्यात आली आहे. नवी दिल्ली येथे राष्ट्रीय शेती शास्त्र विभागाच्या सभागृहात हा पदवीदान समारंभ आयोजित करण्यात आला होता.डॉ. दिनेश नागवेकर हे पर्यावरण शास्त्र संस्था तसेच भारतीय सौर ऊर्जा संस्थेचे आजीवन सदस्य असून देशातील विविध २१ संस्थांचे आजीवन सदस्य आहेत.डॉ. दिनेश नागवेकर यांची निवड आयोगाचे अध्यक्ष एस.के. सिन्हा, डायरेक्टर इंजिनिअर अभिमन्यू सिन्हा आणि निवड समितीने केली असून स्वतःच्या वाहनावर आयोगाचे चिन्ह वापर त्याचा हक्कही डॉ. नागवेकर यांना देण्यात आला आहे.
konkansamwad 
