कासार्डे आनंदनगर येथील मटका अड्ड्यावर कणकवली पोलिसांची कारवाई

कासार्डे आनंदनगर येथील मटका अड्ड्यावर कणकवली पोलिसांची कारवाई

कणकवली


      तालुक्यातील कासार्डे आनंदनगर येथे सुरू असलेल्या मटका अड्ड्यावर कणकवली पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली. या कारवाईत आरोपी अजित रामचंद्र नकाशे (वय 49, रा. कासार्डे) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याच्याकडून मटका साहित्य, मोबाईल असा एकूण 8 हजार 720 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.कासार्डेतील आनंदनगर येथील एका स्टॉलवर मटका सुरू असल्याची गोपनीय माहिती कणकवली पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस हवालदार पांडुरंग पांढरे यांच्यासह अन्य पोलिसांनी आनंदनगर येथील स्टॉलवर छापा टाकला.यावेळी आरोपी अजित नकाशे हा लोकांकडून पैसे घेऊन मुंबई मटका चालवित असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. त्यानंतर नकाशे याच्याकडे मटका लिहिण्यासाठी वापरला जाणारा कागद, एक बॉलपेन, 1 हजार 720 रुपयांची रोख रक्कम आणि 7 हजार रुपये किंमतीचा मोबाईल असे साहित्य जप्त करण्यात आले.आरोपी नकाशे याच्यावर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम 1887 चे कलम 12(अ) आणि बीएनएस 2023 चे कलम 49 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.