सिमेंट वाहतूक करणारा ट्रक भर रस्त्यावर अडकल्याने वाहतूक ठप्प

सिमेंट वाहतूक करणारा ट्रक भर रस्त्यावर अडकल्याने वाहतूक ठप्प

 

ओटवणे

 

      ओटवणे चराठा मार्गांवर सिमेंट वाहतूक करणारा कॅन्टर भर रस्त्यावर अडकल्याने वाहतूक पूर्णतः बंद झाली होती. या अवघड वळणाचा अंदाज न आल्याने त्यातच गाडीतील सिमेंट च्या मोठ्या ओवरलोडमुळे गाडी वळवणे कठीण झाले त्यामुळे ही घटना घडली असावी असा अंदाज आहे. सुदैवाने गाडी पलटी न झाल्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. मात्र या कॅन्टरमुळे पूर्ण रस्ताच बंद झाला त्यामुळे वाहन चालकांना आपल्या गाड्या पागावाडी इन्सुली मार्गातून वळवाव्या लागल्यात. उशिरा पर्यंत हा कॅन्टर रस्त्यावरून बाजूला करण्यात आला नव्हता त्यामुळे वाहन चालकांची मोठी गैरसोय झाली.