परवानाधारक व्यापाऱ्यांमार्फतच शेतमाल खरेदी-विक्री करा.....फसवणूक टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाचे निर्देश, बाजार समित्यांना दक्षतेच्या सूचना
सिंधुदुर्गनगरी
शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी आणि शेतमालाला योग्य भाव मिळवून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. अधिसूचित शेतमालाची खरेदी-विक्री केवळ अधिकृत परवानाधारक व्यापाऱ्यांमार्फतच करण्यात यावी, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. बाजारातील व्यवहारात पारदर्शकता राहावी यासाठी बाजार समित्या आणि खाजगी बाजारांमध्ये शेतमालाची खरेदी केवळ जाहीर लिलावाद्वारेच करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. विनापरवाना व्यापार करणाऱ्यांवर थेट कायदेशीर कारवाई करण्याचे आदेशही प्रशासनाने दिले आहेत.
konkansamwad 
