आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त जावेद खतीब यांच्याकडून बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात टेबल वाटप.

सावंतवाडी.
आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसा निमित्त सावंतवाडी येथील बांदा येथे भाजप युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस जावेद खतीब यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात दहा टेबल वाटप केली. यावेळी सरपंच प्रियांका नाईक, माजी उपसरपंच तथा भाजप युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस जावेद खतीब, स्वप्नील सावंत, निलेश कदम, सुनील धामापूरकर, कैलास गवस, वाफोली उपसरपंच विनेश गवस, गुरुनाथ सावंत, सुधीर शिरसाट, ग्रामपंचायत सदस्य आबा धारगळकर, प्रशांत बांदेकर, शामसुंदर मांजरेकर, शैलेश केसरकर, ज्ञानेश्वर सावंत, देवल येडवे, गुरु कल्याणकर, विलास पावसकर, दीपक सावंत, सिद्धेश महाजन, अक्षय परब, शुभम साळगावकर, प्रवीण नाटेकर, शिवनाथ मळेवाडकर, ऋषीकेश सावंत, बाळा आकेरकर, अभिजित देऊलकर, वसीम बुराण आदी उपस्थित होते.