आंबा घाटात भीषण अपघात.....एस टी ची उभ्या असलेल्या आयशर टेम्पोला जोरदार धडक....तीन जण जखमी
रत्नागिरी
संगमेश्वर तालुक्यातील रत्नागिरी - नागपूर महामार्गावरील आंबा घाटातील गोवरेवाडी बस थांब्याजवळ उभ्या असलेल्या टेम्पोला धडक देऊन झालेल्या अपघातात तीन जण जखमी झाल्याची घटना आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास घडली. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार जितेंद्र पाटील राहणार सध्या लांजा यांच्या ताब्यातील धाराशिव - लांजा गाडी एम एच १४एम एच ४८३५ ही गाडी घेऊन जात असताना उभ्या असलेल्या आयशर टेम्पोला ( एम एच ०७ ए जे ६५५८) पाठीमागून जोरदार धडक देऊन झालेल्या अपघातात तीनजण जखमी झाल्याची घटना आज पहाटे पाच वाजता घडली. आयशर टेम्पो पंक्चर झाल्याने तो उभा होता. या अपघातात वाहक रोकडेश्वर तोटेवार राहणार लांजा, फुलाजी बत्तलवाड,वैष्णवी बत्तलवाड रा लांजा हे जखमी झाले. अपघाताची खबर ११२ वर कॉल आल्याने साखरपा पोलिसांना समजले असता पोलिसांनी तात्काळ अपघातस्थळी जाऊन जखमीना त्वरित पोलीस गाडीतून साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्रात आणून उपचार करण्यात आले. त्यानंतर अधिक उपचारासाठी रत्नागिरी येथे हलविण्यात आले.पोलीस हेड कॉन्स्टेबल नितीन जाधव, पोलीस कॉन्स्टेबल सुजित पाटील, चालक स्वप्नील कांबळे यांनी अपघातग्रस्त ठिकाणी जखमीना क्षणाचीही वाट न पाहता साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आणले. आजही खाकी वर्दीतील माणुसकी पहायला मिळाली. यासंबधीची पोलीस कार्यवाही सुरु आहे.
konkansamwad 
