खासदार नारायण राणेंच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडीत टेबल टेनिस स्पर्धेचे आयोजन

खासदार नारायण राणेंच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडीत टेबल टेनिस स्पर्धेचे आयोजन

 

सावंतवाडी 

 

   खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून 'संसद कोकण समृद्धी महोत्सव २०२६' अंतर्गत जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा १० एप्रिल २०२६ ला सकाळी ९ वाजता सावंतवाडी येथील जिमखाना मैदानावर पार पडणार आहे. या स्पर्धेमध्ये विविध वयोगटातील खेळाडूंसाठी आकर्षक रोख पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. १३ वर्षाखालील मुले-मुली आणि १७ वर्षाखालील मुलांच्या गटात प्रथम क्रमांकासाठी ३००० रुपये तर द्वितीय क्रमांकासाठी २००० रुपये दिले जाणार आहेत. तसेच खुल्या गटात (मुले-मुली) प्रथम ५००० व द्वितीय ३००० आणि दुहेरी खुल्या गटासाठी ६००० व ४००० रुपये अशा मोठ्या बक्षिसांची लयलूट होणार आहे. स्पर्धेच्या नियोजनासाठी आयोजित बैठकीत भाजप शहर मंडळ अध्यक्ष सुधीर आडिवरेकर, सरचिटणीस दिलीप भालेकर, युवा मोर्चा शहर अध्यक्ष हितेन नाईक, नगरसेवक तथा सभापती प्रतीक बांदेकर यांच्यासह खेळाडू संकेत राऊळ, शुभम मुळीक आणि अक्षय पंडित उपस्थित होते. जिल्ह्यातील टेबल टेनिसपटूंना आपली प्रतिभा दाखवण्यासाठी ही मोठी संधी असून जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. नावनोंदणीसाठी इच्छुकांनी पंकज तुळसुळकर (९१३०६८३४७२) किंवा भाजप कार्यालय (७८७५५२५४९६) या क्रमांकावर संपर्क साधावा