माजी नगराध्यक्ष संजू परब यांचे समर्थक बंटी पुरोहित शिवसेनेत

सावंतवाडी
माजी नगराध्यक्ष संजू परब यांचे खंदे समर्थक असणारे बंटी पुरोहित यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांना हा प्रवेश देण्यात आला.यावेळी जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत यांनी त्यांचे स्वागत केले. परब हे शिवसेनेत गेल्यानंतर पुरोहित हे गेले काही दिवस शांत होते. यानंतर आपल्या सोबत येणाऱ्या कार्यकर्त्यांना आपण पक्षात प्रवेश देणार आहे, असे परब यांनी जाहीर केले होते. या पार्श्वभूमीवर बंटी पुरोहित यांचा प्रवेश घेण्यात आला असून मालवण येथे आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांना पक्षात प्रवेश देण्यात आला. यावेळी परब यांच्यासह आनंद शिरवलकर, शिवसेनेचे प्रेमानंद देसाई आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.