मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम उद्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर
सिंधुदुर्ग
महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम उद्या, दि. २६ ऑक्टोबर २०२६ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यादरम्यान ते इच्छुक नागरिक आणि राजकीय पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार असून, विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाच्या कामकाजाचा आढावा घेणार आहेत. तसेच ते नवीन ईव्हीएम गोडाऊनला भेट देऊन पाहणी करणार आहेत. मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम हे उद्या दुपारी १ ते २ या वेळेत इच्छुक नागरिक आणि राजकीय पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर दुपारी ३ ते ४ या वेळेत विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील कामकाजाचा आढावा घेण्यात येणार आहे. या दौऱ्यात नवीन ईव्हीएम गोडाऊनला भेट देऊन पाहणी केली जाणार आहे.
konkansamwad 
