जिल्हा परिषद शाळांची दिवाळी सुट्टी ७ नोव्हेंबरपासून लागू करण्याची मागणी.....जिल्हा परिषद अध्यक्षांचे सकारात्मक आश्वासन

जिल्हा परिषद शाळांची दिवाळी सुट्टी ७ नोव्हेंबरपासून लागू करण्याची मागणी.....जिल्हा परिषद अध्यक्षांचे सकारात्मक आश्वासन

सिंधुदुर्ग

 

     जिल्हा परिषद प्राथमिक शाळांची दिवाळी सुट्टी ७ नोव्हेंबर २०२६ पासून लागू करावी, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती शाखा सिंधुदुर्गने जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत आणि शिक्षण सभापती प्रितेश राऊळ यांची भेट घेऊन निवेदन दिले.जिल्ह्यातील अनेक शिक्षकांचे मूळ गाव परजिल्ह्यात असल्याने दिवाळी सणासाठी गावी जाण्यास अडचण होत असल्याने सुट्टीच्या कालावधीत बदल करण्याची मागणी करण्यात आली.यावर अध्यक्ष प्रमोद कामत आणि शिक्षण सभापती प्रितेश राऊळ यांनी ७ नोव्हेंबरपासून दिवाळी सुट्टी लागू करण्याचे सकारात्मक आश्वासन दिले असून शनिवारचा दिवस जादा काम करून भरून काढण्याचे आवाहन केले.या शिष्टमंडळात जिल्हाध्यक्ष संतोष पाताडे, किरण चेंडगे, तुकाराम खिल्लारे, सागर कु-हाडे आणि मधुकर बाचिपळे उपस्थित होते.