मध्य रेल्वेच्या ८ विशेष गाड्या - मुंबई- मडगांव आणि मुंबई- नागपूर दरम्यान धावणार
मुंबई, दि. ३०
सुट्टीच्या काळात प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने मुंबई ते मडगांव आणि मुंबई ते नागपूर दरम्यान ८ साप्ताहिक विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
१) लोकमान्य टिळक टर्मिनस - मडगांव (४ सेवा)
▪️गाडी क्र. 01029 ही दिनांक ०२.१०.२०२६ (शुक्रवार) आणि ०४.१०.२०२६ (रविवार) रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून ००.२५ वाजता सुटेल आणि मडगांव येथे त्याच दिवशी १५.१५ वाजता पोहोचेल.
▪️गाडी क्र. 01030 ही दिनांक ०२.१०.२०२६ आणि ०४.१०.२०२६ रोजी मडगांव येथून १६.०० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी ०३.४५ वाजता पोहोचेल.
▪️थांबे: ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडावली, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवि आणि करमळी.
२) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - नागपूर (४ सेवा)
▪️गाडी क्र. 02141 ही दिनांक ०२.१०.२०२६ आणि ०४.१०.२०२६ रोजी CSMT येथून ००.२५ वाजता सुटेल आणि नागपूर येथे त्याच दिवशी १५.३५ वाजता पोहोचेल.
▪️गाडी क्र. 02142 ही त्याच दिवशी नागपूर येथून १६.५० वाजता सुटेल आणि CSMT येथे दुसऱ्या दिवशी ०९.२० वाजता पोहोचेल.
▪️थांबे: दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी (फक्त 02142 साठी), नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा.
▪️डब्यांची रचना: दोन्ही गाड्यांना ४ वातानुकूलित तृतीय, ११ शयनयान, ५ सामान्य द्वितीय श्रेणी आणि २ गार्ड्स ब्रेक व्हॅन.
▪️आरक्षण: गाडी क्र. 01029, 02141 आणि 02142 साठी आरक्षण दि. ०१.१०.२०२६ पासून सर्व PRS केंद्रांवर आणि www.irctc.co.in वर सुरू होईल. अनारक्षित तिकिट UTS द्वारे मिळेल. सविस्तर वेळापत्रकासाठी www.enquiry.indianrail.gov.in किंवा NTES ॲप पहावे.
konkansamwad 
