अणसूर पाल हायस्कूलच्या हर्षदा धुरीची शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी

अणसूर पाल हायस्कूलच्या हर्षदा धुरीची शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी

 

अणसूर

 

      महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत इयत्ता 8वीतील अणसूर पाल हायस्कूल, अणसूरच्या कु. हर्षदा निलेश धुरी हिने गुणवत्ता यादीत स्थान मिळवले आहे.हर्षदाला या परीक्षेत 164 गुण म्हणजेच 54.66 टक्के गुण प्राप्त झाले आहेत. जाहीर झालेल्या गुणवत्ता यादीत तिचा वेंगुर्ला तालुक्यातून 13 वा आणि जिल्ह्यातून 88 वा क्रमांक आला आहे. ग्रामीण भागातील शाळेतील विद्यार्थिनीने मिळवलेले हे यश आश्वासक आणि कौतुकास्पद आहे.हर्षदाच्या या यशाबद्दल  मुख्याध्यापक राजेश घाटवळ, ज्येष्ठ शिक्षिका सौ. अक्षता पेडणेकर, सहा. शिक्षक विजय ठाकर, सौ. प्रीती परब, सौ. संचिता परब यांनी तिला शाल आणि भेटवस्तू देऊन अभिनंदन केले.अणसूर पाल विकास मंडळ मुंबईचे अध्यक्ष श्री. गोविंद गावडे, सचिव श्री. लिलाधर गावडे, सर्व संस्था सदस्य, शालेय समिती चेअरमन श्री. मातोंडकर सर, सदस्य दिपक गावडे, दत्ताराम गावडे, देऊ गावडे आणि संपूर्ण शालेय परिवाराने कु. हर्षदा धुरीचे हार्दिक अभिनंदन केले आहे.