आरवली जीवन शिक्षण शाळेला देवी जागबाई देवस्थानतर्फे इन्व्हर्टर भेट

आरवली जीवन शिक्षण शाळेला देवी जागबाई देवस्थानतर्फे इन्व्हर्टर भेट

 

आरवली

 

        वेंगुर्ला तालुक्यातील आरवली गावातील आरवली जीवन शिक्षण शाळेला देवी जागबाई देवस्थानतर्फे इन्व्हर्टर भेट देण्यात आला असून देणगी रकमेच्या व्याजातून विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्याचे वाटपदेखील करण्यात आले. जीवन शिक्षण शाळा आरवली नं. १ येथे श्री देवी जागबाई रवळनाथ पंचायतन देवस्थान, आरवली कमिटी अध्यक्ष व सदस्य शंकर भगत याजकडून शाळेला इन्व्हर्टर  देण्यात आला. तसेच दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी प्रशालेतील विद्यार्थ्यांना देवी जागबाई रवळनाथ पंचायतन देवस्थान आरवलीमार्फत शालापयोगी वस्तूंचे वाटपदेखील करण्यात आले. मुंबई येथील क्षमा पालेकर यांनी ठेव ठेवलेल्या रकमेच्या व्याजातून दरवर्षी  मुलांना शालापयोगी वस्तूंचे वाटप करण्यात येते. हे वाटप शेटये टाककर ट्रस्टचे अध्यक्ष दादा शेट्ये यांच्या हस्ते करण्यात आले."शिक्षक विद्यार्थ्यांसाठी अनेक शैक्षणिक उपक्रम राबवितात, म्हणून शाळेचा दर्जा टिकून आहे", असे गौरवद्गार दादा शेट्ये यांनी काढून सर्वांचे कौतुक केले. यावेळी शाळा व्यवस्थापन अध्यक्ष डॉ. नेहा गावडे, डॉ. प्रसाद साळगावकर, मुख्याध्यापक वैभवी रायशिरोडकर, प्रशालेतील शिक्षक उपस्थित होते. या परिसरात वारंवार विज पुरवठा खंडित होत असल्याने श्री देवी जागबाई रवळनाथ देवस्थान आरवली यांनी प्रशालेला इन्व्हर्टर भेट देऊन विद्यार्थ्यांची विजेची सोय केल्याबद्दल तसेच दरवर्षी विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्याचे वाटप करण्यात येते त्याबद्दल प्रशालेच्यावतीने मुख्याध्यापक वैभवी शिरोडकर यांनी सर्वांचे आभार मानले.