जिल्ह्याचे नवे पोलीस अधीक्षक मोहन दहिकर यांनी स्वीकारला पदभार

सिंधुदुर्गनगरी
जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने नूतन पोलीस अधीक्षकांचे स्वागत व मावळत्या पोलीस अधीक्षकांचा निरोप समारंभ कार्यक्रम पोलीस अधीक्षक भवनात पार पडला. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मावळते पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांची पुणे येथील गुन्हे अन्वेषण विभागाकडे बदली झाली असून पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्याला चांगले सहकार्य दिले व या जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था, गुन्हेगारी कारवाया यावर वचक ठेवता आली असे त्यांनी यावेळी सांगितले. नव्या पोलीस अधीक्षकांचे पोलीस प्रशासनाकडून स्वागत करण्यात आले.अग्रवाल यांनी पोलीस अधीक्षक मोहन दहिकर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी अपर पोलीस अधीक्षक ऋषिकेश रावले व अन्य पोलीस अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.