कणकवलीत 'हॉटेल कोकण हाऊस'चा दिमाखात शुभारंभ; खवय्यांसाठी नवी पर्वणी
कणकवली
खवय्यांसाठी पर्वणी ठरणारे हॉटेल कोकण हाऊस आजपासून ग्राहकांच्या सेवेत दाखल झाले आहे. मुंबई-गोवा हायवेच्या शेजारी, वामन हरी पेठे ज्वेलर्सच्या लगत या नवीन हॉटेलचा भव्य उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडला.या उद्घाटन सोहळ्यास नगरसेविका आर्या औदुंबर राणे यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. हॉटेलच्या मालक माधवी महादेव राणे, सोहम महादेव राणे आणि तनीषा बाणावलकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले.या प्रसंगी हॉटेल मिंटलीफचे मालक हरिष उचले, शासकीय ठेकेदार व्यंकटेश सावंत, औदुंबर राणे, भालचंद्र वरवडेकर, योगेश कोरगावकर, सतेज कोरगावकर, मयुरेश बाणावलकर, संदेश आर्डेकर, संदेश चव्हाण, समीर सावंत यांसह मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.कोकण हाऊसच्या माध्यमातून ग्राहकांना उत्तम दर्जाची सेवा आणि चवदार पदार्थ मिळतील असा विश्वास व्यक्त करत सर्व मान्यवरांनी व्यवस्थापनाला पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
konkansamwad 
