माजी सभापती निलेश सामंत यांच्या माध्यमातून परुळे शेळपी परिसरात निवारा शेड.

माजी सभापती निलेश सामंत यांच्या माध्यमातून परुळे शेळपी परिसरात निवारा शेड.

परुळे.

   माजी सभापती निलेश सामंत यांच्या माध्यमातून परुळे शेळपी बीब्याची राई येथील एसटी बस थांबा येथे निवारा शेड ची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. येथील ग्रामस्थांनी कित्येक दिवसांच्या मागणीला श्री.निलेश सामंत यांनी प्रतिसाद देत ग्रामस्थांचा हा प्रश्न सोडविला आहे.यावेळी या शेडमूळे प्रवाशांची होणारी गैरसोय दूर झाली आहे.तसेच पावसा पाण्यामुळे होणारा त्रास दूर झाला आहेत.
याबद्दल येथील ग्रामस्थांनी माजी सभापती निलेश सामंत यांचे आभार मानले.
   बांधण्यात आलेल्या शेडचे उद्घाटन नुकतेच भारतीय जनता पक्षाचे युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष प्रसाद पाटकर यांनी केले. यावेळी येथील राजन परब. रमेश गावडे दत्ता परब यांसह ग्रामस्थ उपस्थित होते.