आजगाव ग्रामस्थांच्या मायनिंग विरोधी आंदोलनाला मनसेचा पूर्ण पाठिंबा
आजगाव
जेएसडब्ल्यू कंपनीच्या मार्फत आजगाव व आसपासच्या गावांमध्ये मायनिंग सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. कंपनीने ड्रोन सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे ग्रामस्थांमध्ये खळबळ उडाली आहे.जिल्हा परिषदेच्या सभागृहात अधिकृत ठराव मंजूर करण्यात आला आहे, ज्यामुळे सत्ताधारी पक्षांवर गंभीर आरोप केले जात आहेत. शिवसेना आणि भाजपा युतीच्या ताब्यात असलेल्या जिल्हा परिषदेत हा ठराव मंजूर झाला तेव्हा दोन्ही पक्षांचे सदस्य तोंड बंद करून का बसले होते, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.मनसेचे जिल्हाध्यक्ष ॲड. अनिल केसरकर यांनी सत्ताधाऱ्यांना आवाहन केले आहे की, "सत्तेचा वापर करून हा प्रदूषणकारी प्रकल्प रद्द करा. आम्ही मनसे तर्फे ग्रामस्थांच्या पाठीशी आहोत आणि या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा देऊ."केसरकर यांनी असेही सांगितले की, "मायनिंग विरोधी लढ्यात मनसे पूर्ण ताकदीनिशी ग्रामस्थांच्या पाठीशी आहे. आमचे वरिष्ठ नेते लवकरच ग्रामस्थांच्या भेटीसाठी येणार आहेत."ग्रामस्थांना आवाहन केले जात आहे की, आपले हक्क आणि निसर्गाचे रक्षण करण्यासाठी एकजुटीने लढा
konkansamwad 
