परुळे येथे जागतिक महिला दिनानिमित्त भव्य रॅली आणि सांस्कृतिक सोहळ्याचे आयोजन
परुळे
जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर परुळे गावात महिलांसाठी विशेष कार्यक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. परुळे युवक कला क्रीडा मंडळ (महिला विभाग) यांच्या वतीने शुक्रवार, ७ मार्च रोजी दुपारी ३.३० वाजता जागतिक महिला दिन उत्साहात साजरा केला जाणार आहे.या निमित्ताने गावातून भव्य महिलांची रॅली काढण्यात येणार असून ही रॅली आदिनारायण मंदिर ते वराठी मंगल कार्यालय या मार्गावर ढोल-ताशांच्या गजरात पार पडणार आहे. स्त्रीशक्तीचा जागर आणि ऐक्याचा संदेश देत महिलांचा उत्स्फूर्त सहभाग अपेक्षित आहे.रॅलीनंतर वराठी मंगल कार्यालय येथे सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. महिलांच्या विविध गुणांना वाव देणारे कार्यक्रम सादर होणार आहेत. यामध्ये समूह नृत्य, वारकरी भजन, कोळी नृत्य, एकपात्री अभिनय, गायन-वादन तसेच मालवणी गाऱ्हाणे यांचा समावेश आहे. तसेच गावातील कर्तृत्ववान महिलांचा सत्कारही करण्यात येणार आहे.उपस्थित सर्वांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली असून, हा कार्यक्रम प्रेरणादायी आणि उत्साहवर्धक ठरणार आहे. स्त्रीशक्तीचा सन्मान करत महिला दिन एकजुटीने आणि आनंदात साजरा करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

konkansamwad 
