सिंधुदुर्ग साईकृपा अपंगशक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्थेच्या वतीने दिव्यांग बांधवांच्या पाल्यांना शैक्षणिक साहित्य वाटप.

सिंधुदुर्ग साईकृपा अपंगशक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्थेच्या वतीने दिव्यांग बांधवांच्या पाल्यांना शैक्षणिक साहित्य वाटप.

सिंधुदुर्ग.

   सिंधुदुर्ग साईकृपा अपंगशक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्था, कसाल या संस्थेच्या वतीने शनिवार २२ रोजी गोविंद सुपर मार्केट ओरोस येथे दिव्यांग बांधवांचा कॅम्प घेण्यात आला.
    यावेळी डॉ.सावंत, व आईर मॅडम यांच्या हस्ते हेलेन केलर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.त्यावेळी उपस्थित दिव्यांग बांधवांना व त्यांच्या पाल्यांना संस्था अध्यक्ष श्री.अनिल शिंगाडे यांनी शिक्षणाचे महत्व व स्वावलंबी बनणे या विषयी मार्गदर्शन केले.
    दिव्यांग बांधवांच्या 1ली ते 12वी पाल्यांना वही, पेन, पट्टी, नोटपॅड, इत्यादी मोफत शैक्षणिक साहित्य देण्यात आले.व 10वी/12वी उत्तीर्ण झालेल्या दिव्यांगाच्या पाल्यांचा गौरव करण्यात आला. तसेच उपस्थित दिव्यांग बांधवांना रेनकोट वाटप करण्यात आला.यावेळी जवळ जवळ 40 हून अधिक दिव्यांग बांधव उपस्थित होते.
    या कार्यक्रमामध्ये प्रकाश वाघ, शामसुंदर लोट, डॉ.सदाशिव राऊळ, सुनील तांबे, प्रशांत कदम, उमेश कुंभार, रामदास सावंत, श्रीराम पुजारे, सुधाकर सावंत आदि मान्यवर उपस्थित होते.प्रकाश वाघ यांनी उपस्थित होते.