मालवणमध्ये मोकाट गुरांचा बंदोबस्त.....नगरपरिषदेची धडक कारवाई
मालवण
शहरातील रस्ते व सार्वजनिक ठिकाणी मोकाट फिरणाऱ्या गुरांमुळे नागरिकांना होणारा त्रास आणि वाहतुकीला निर्माण होणारा धोका लक्षात घेऊन मालवण नगरपरिषदेने मोकाट गुरांविरोधात कारवाईची मोहीम सुरू केली आहे.या मोहिमेदरम्यान नगरपरिषदेच्या पथकाने शहरातील विविध भागांत फिरणाऱ्या मोकाट गुरांना पकडून ताब्यात घेतले. रस्त्यांवर गुरांचा वावर वाढल्याने वाहनचालक आणि पादचाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत असून अपघाताची शक्यता वाढली आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ही कारवाई करण्यात येत असल्याचे प्रशासनाने सांगितले.मोकाट गुरे रस्त्यावर सोडणाऱ्या पशुमालकांनी आपल्या जनावरांची योग्य व्यवस्था करावी. सार्वजनिक ठिकाणी गुरे मोकाट सोडल्यास नियमानुसार संबंधित पशुमालकांवर कारवाई केली जाईल, असा इशारा नगरपरिषद प्रशासनाने दिला आहे.'स्वच्छ, सुंदर व सुरक्षित मालवण' या उद्देशाने ही मोहीम पुढेही सुरू ठेवण्यात येणार असल्याचे नगरपरिषदेने स्पष्ट केले आहे.
konkansamwad 
