वेंगुर्ला तालुक्यातील वायंगणी गावचे भालचंद्र नाईक यांचे निधन

वेंगुर्ला
वेंगुर्ला तालुक्यातील वायंगणी गावचे रहिवासी तसेच वायंगणी ग्रा.पं.चे माजी सदस्य तथा समाजसेवक श्री. भालचंद्र सूर्याजी नाईक यांचे वयाच्या १०१ व्या वर्षी राहत्या घरी वायंगणी येथे निधन झाले.त्यांच्या पश्चात दोन मुलगे, सुना, दोन मुली, नातवंडे असा मोठा परिवार आहे. वेंगुर्ले पंचायत समितीचे माजी सभापती दीपक नाईक व कीर्तनकार अवधूत नाईक यांचे ते वडील होत तर ॲडव्होकेट व नोटरी प्रथमेश नाईक यांचे ते आजोबा होत.