कनिष्ठ महाविद्यालय प्रवेशासाठी मराठा समाजाला एससीबीसी आरक्षण लागू करा. देवगड तालुका मराठा समाजाची देवगड तहसिलदार व गट विकास अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी.

देवगड.
कनिष्ठ महाविद्यालय प्रवेशासाठी मराठा समाजाला एसईबीसीचे आरक्षण लागू करण्यात लागू करा या संदर्भात देवगड तालुका मराठा समाजाच्या वतीने देवगड तहसीलदार,देवगड पंचायत समिती गटविकास अधिकारी यांना याबाबत शुक्रवारी निवेदने देण्यात आली.
या निवेदनात म्हटले आहे की, मराठा समाजाला SEBC चे आरक्षण शासनाकडून जाहीर झाले असल्याने यापूर्वी मिळणारे EWS या प्रवर्गाचे आरक्षण आता मिळत नाही. सध्या कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयात प्रवेश प्रक्रिया सुरू असून वरिष्ठ महाविद्यालयातील प्रवेशासाठी मुंबई विद्यापीठाने SEBC ला १० टक्के आरक्षण प्रवेश प्रक्रियेत जाहीर केले आहे. मात्र शालेय शिक्षण विभागाने याबाबत अद्याप कोणतेही सूचना काढली नसल्याने शासनाने जाहीर केलेल्या आरक्षणाचा लाभ मराठा मुलांना मिळणार नाही. आणि समाजावर अन्याय होणार आहे. यासंदर्भात श्रीमती शिंपी मॅडम , शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्याशी दिनांक १२ जून २०२४ रोजी संपर्क साधला असता त्यांनी याबाबत अद्याप आम्हाला सूचना प्राप्त झाली नसल्याने आरक्षण देता येणार नाही. असे सांगितले दिनांक १५ जून रोजी पहिली गुणवत्ता यादी जाहीर करण्याबाबत शिक्षण उपसंचालक यांनी सर्व स्तरावर कळविले असून यात मराठा आरक्षण १० टक्के देण्याबाबत काहीही सूचना दिलेली नाही. याबाबत योग्य ती भूमिका लगेचच घेऊन मराठा समाजावर होणारा अन्याय दूर करावा ही विनंती. अशा आशयाचे निवेदन देवगड तालुका मराठा समाजाच्या वतीने देवगड तहसीलदार व देवगड पंचायत समिती कार्यालयात देण्यात आले.देवगड तहसीलदार मधील निवेदन नायब तहसीलदार श्रीकृष्ण ठाकूर यांच्याकडे देण्यात आले. तर पंचायत समितीमधील निवेदन देवगड गटशिक्षणाधिकारी श्रीरंग काळे यांच्याकडे देण्यात आले. यावेळी देवगड तालुका मराठा समाजाचे अध्यक्ष संदीप साटम सचिव केदार सावंत सहखजिनदार किसन सूर्यवंशी दयानंद पाटील बंटी कदम आदी उपस्थित होते.