वीज कंत्राटी कामगाराचा मृत्यू झाल्यास वारसाला आर्थिक मदत.

वीज कंत्राटी कामगाराचा मृत्यू झाल्यास वारसाला आर्थिक मदत.

पुणे.

   महावितरणच्या तिन्ही कंपन्यांपैकी कोणत्याही कंपनीतील वीज कंत्राटी कामगार अपघातात मृत झाल्यास त्याच्या वारसाला चार लाख रुपये देण्याची तरतूद करण्यात आली. महापारेषणकडून याबाबतचे परिपत्रक काढण्यात आले आहे. त्यामुळे वीज कंत्राटी कामगारांना मोठा दिलासा मिळणार आहे.महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे (संलग्न भारतीय मजदूर संघ) अध्यक्ष नीलेश खरात यांनी ही माहिती दिली. उपमुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे भारतीय मजदूर संघाशी संलग्न महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ व अन्य विविध संघटना प्रमुख यांची नुकतीच बैठक झाली. या बैठकीत संघाच्या वतीने विविध मागण्या करण्यात आल्या. तसेच वीज कंत्राटी कामगारांचा अपघात झाल्यास त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसाठी कोणतीही आर्थिक मदत देण्याची तरतूद नाही, ही बाब ऊर्जामंत्र्यांच्या लक्षात आणून दिली. त्याची दखल घेऊन ऊर्जामंत्र्यांनी याबाबत तातडीने कारवाई करण्याचा सूचनाही ऊर्जा विभागाच्या प्रधान सचिव आभा शुक्ला यांना दिल्या. त्यानुसार हे परिपत्रक काढण्यात आले.