पाटकर हायस्कूल येथे विज्ञान नाटय स्पर्धा उत्साहात संपन्न.

पाटकर हायस्कूल येथे विज्ञान नाटय स्पर्धा उत्साहात संपन्न.

वेंगुर्ला.

   विज्ञान नाटय महोत्सव सन 2023-2024 
अंतर्गत वेंगुर्ला तालुका विज्ञान नाटय स्पर्धा रा.कृ. पाटकर हायस्कूल वेंगुर्ला येथे संपन्न झाली.या कार्यक्रमाचे उद्घाटन दीप प्रज्जवलनाने करण्यात आले. यावेळी गटविकास अधिकारी संतोष गोसावी, शिक्षणं विस्तार अधिकारी भाकरे मॅडम, ठाकूर मॅडम, श्री सावंत सर, श्री. कुंभार सर,(सर्व BRC) उपस्थित होते.
   प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. सोकटे सर यांनी प्रास्ताविक केले.स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून नाटय कर्मी  सुरेंद्र खामकर, तसेच प्रा.राणे, प्रा.मुजुमदार यांनी काम पाहिले. सुत्रसंचलन श्रीम. मांजरेकर मॅडम यांनी केले.
   स्पर्धेतील विजेते पुढीप्रमाणे -
प्रथम क्रमांक  - श्री देवी सातेरी हायस्कूल वेतोरे.
द्वितीय क्रमांक- न्यू इंग्लिश स्कूल उभादांडl हायस्कूल.
तृतीय क्रमांक - रा. कृ. पाटकर हायस्कूल वेंगुर्ला.
स्पर्धेतील विजेते आणि सहभागी शाळा यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले.
   यावेळी प्रशालेच्या एकाक चे लेखन व दिग्दर्शन मुख्याध्यापक श्री सोकटे सर तर सूत्रधार संयोजन श्रीम. जाधव मॅडम यांनी केले.यावेळी सौ. खरात मॅडम, सौ पिळणकर मॅडम, श्री. पेडणेकर सर, सर्व विद्यार्थी, आणि प्रशालेचे कर्मचारी यांच्या सहकार्याने कार्यक्रम उत्तमरीत्या संपन्न झाला.