आत्मनिर्भर भारत अभियान अंतर्गत कृषी पायाभूत सुविधा निधी योजना कार्यशाळा संपन्न.

आत्मनिर्भर भारत अभियान अंतर्गत कृषी पायाभूत सुविधा निधी योजना कार्यशाळा संपन्न.

देवगड.

   आत्मनिर्भर भारत अभियान अंतर्गत कृषी पायाभूत सुविधा निधी योजना अंतर्गत दिनांक 28 ऑगस्ट 2023 रोजी मो.ज.गोगटे सांस्कृतिक भवन जामसंडे ता.देवगड येथे कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत श्री.खुरकुटे, नोडल अधिकारी,SMART- आत्मा,श्री.अजय थुटे, जिल्हा विकास प्रबंधक, नाबार्ड, श्री.मेश्राम, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक, श्रीम.दिया जाधव, डीआरपी, श्रीम.अस्मिता जाधव, तालुका व्यवस्थापक, माविम,श्री.आदित्य घाडी, एचडीएफसी बँक देवगड, श्री.विवेक शहारे, युको बँक, देवगड आणि श्री.दिनेश काकतकर, विदर्भ कोकण बँक, मुटाट आदी उपस्थित होते.
   या योजनेची सविस्तर माहिती अंतर्गत उद्दिष्ट, पात्र लाभार्थी, व्याज सवलत, पतहमी,पात्र प्रकल्प,योजनेत सहभागी होण्याची प्रक्रिया याबाबत सविस्तर माहिती सादरीकरणा द्वारे काढणी पश्चात व्यवस्थापन सुविधा आणि सामूहिक शेती सुविधा निर्माण करणेस प्रोत्साहन देऊन एकूणच कृषी पायाभूत सुविधा उभारणे अपेक्षित आहे यासाठी मध्यम व दीर्घ मुदतीच्या आर्थिक गुंतवणुकीची सुविधा निर्माण करण्यात येणार आहे. या योजनेत प्राथमिक कृषी पतसंस्था, विपणन सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक संस्था, स्वयंसहायता गट, शेतकरी, कृषी उद्योजक, कृषी उत्पन्न बाजार समिती, शेतकरी उत्पादक कंपनी इत्यादी पात्र आहे. या योजनेत एकूण रुपये दोन कोटी पर्यंतच्या कर्जावर तीन टक्के व्याज सवलत सात वर्षांपर्यंत देण्यात येईल. या योजनेत सहभागी होण्यासाठी अर्जदारांनी ऑनलाइन पद्धतीने  www.agriinfra.dac.gov.in या पोर्टलवर नोंदणी करावयाची आहे.या बाबतची सविस्तर माहिती श्री.खुरकुटे, नोडल अधिकारी,SMART- आत्मा यांनी दिली तसेच श्री.अजय थुटे,जिल्हा विकास प्रबंधक,नाबार्ड यांनी अन्नधान्याची प्रक्रिया करणेसाठी ही योजना निर्माण केली आहे तसेच कृषी पायाभूत सुविधा योजनेचे महत्त्व विषद करून महिला बचतगट,शेतकरी उत्पादक गट,वैयक्तिक शेतकरी यांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेण्याचे आवाहन केले. श्री.मेश्राम,जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक,बँक ऑफ इंडिया यांनी 8 जुलै 2020 पासून पुढे घेण्यात आलेल्या कृषी उदयोग कर्जावर 3% व्याजात सवलत मिळणेची पद्धत आणि इतर योजनेतून व्याजात सवलत मिळत असेल तरी या योजनेतून फायदा घेणेबाबत उपस्थितांना अवगत करून बँकेशी संदर्भात अडचणी बाबत शंका समाधान केले.श्रीम.दिया जाधव, जिल्हा संसाधन व्यक्ती यांनी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना संदर्भात माहिती दिली.उपस्थित सर्व बँकेचे अधीकारी यांनी आपली ओळख करून देऊन संपूर्ण सहकार्य करणेत येईल असे मनोगत व्यक्त केले.
   तालुका कृषि अधिकारी, देवगड कैलास ढेपे यांनी प्रास्ताविक पर मनोगत व्यक्त करतांना या योजनेचे महत्त्व आणि सदरच्या योजनेचा लाभ इतरांनाही मिळणेकरिता प्रचार, प्रसिद्धी करणेबाबत उपस्थितांना आवाहन केले.या कार्यशाळेत या योजनेशी संबंधित असलेले उद्योजक,महिला बचतगट,शेतकरी उत्पादक कंपनी,इ.उत्सुक लाभार्थी तसेच कृषि विभागाचे सर्व अधिकारी/ कर्मचारी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्र संचालन व आभार प्रदर्शन श्री.निकेतन राणे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक आत्मा यांनी केले.