एस.एस.पी.एम. कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगची युवा महोत्सवात दमदार कामगिरी....वक्तृत्वात प्रथम, कथाकथनात द्वितीय; वादविवाद, पोस्टर मेकिंग व ऑन-द-स्पॉट पेंटिंगमध्येही यश

एस.एस.पी.एम. कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगची युवा महोत्सवात दमदार कामगिरी....वक्तृत्वात प्रथम, कथाकथनात द्वितीय; वादविवाद, पोस्टर मेकिंग व ऑन-द-स्पॉट पेंटिंगमध्येही यश

 

कणकवली

 

     मुंबई विद्यापीठाच्या 59 व्या आंतर-महाविद्यालयीन/संस्था/विभागीय युवा महोत्सव 2026-27 च्या सिंधुदुर्ग विभागीय फेरीत एस.एस.पी.एम. कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, कणकवलीच्या विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, सावंतवाडी येथे झालेल्या विभागीय फेरीत विद्यार्थ्यांनी आपल्या वक्तृत्व, साहित्यिक व कलात्मक कौशल्यांचे प्रभावी सादरीकरण केले. 

महाविद्यालयाला पुढील उल्लेखनीय यश प्राप्त झाले :

Elocution - Group A (Marathi): कु. तनया पांचाळ प्रथम क्रमांक

Story Telling: कु. गायत्री नाईक द्वितीय क्रमांक

Debate - Group A (Marathi): शुभम खरात व राजनंदिनी चौगुले - द्वितीय क्रमांक

Debate - Group B (Hindi/English): कु.

कवटकर भार्गवी संजय व श्री. साह रणजीत मुन्ना – तृतीय क्रमांक

Poster Making: श्री. तनय तुकाराम पार्ट - तृतीय क्रमांक

On-the-Spot Painting: श्री. तनय तुकाराम पार्टे तृतीय क्रमांक

    या उल्लेखनीय कामगिरीमुळे संबंधित विजेत्या विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाच्या पुढील/अंतिम फेरीसाठी निवड झाली आहे. अंतिम फेरीत हे विद्यार्थी आपल्या महाविद्यालयासह सिंधुदुर्ग विभागाचे प्रतिनिधित्व करणार आहेत.विद्यार्थ्यांच्या या यशामागे झोनल युवा महोत्सव समन्वयक डॉ. एस. टी. माने यांचे मोलाचे मार्गदर्शन, महाविद्यालयाच्या सांस्कृतिक समिती चे सहकार्य आणि विद्यार्थी समन्वयक भार्गवी कवटकर व तनय पार्टे यांच्या नियोजनबद्ध प्रयत्नांचा महत्त्वपूर्ण वाटा आहे.या यशाबद्दल संस्थेच्या अध्यक्षा मा. सौ. नीलमताई राणे, उपाध्यक्ष मा. निलेश राणे, सचिव मा. ना. नितेश राणे तसेच संस्थापक मा. नारायणराव राणे यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एस. बाडकर, सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले असून, आगामी अंतिम फेरीसाठी त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.सांस्कृतिक, साहित्यिक आणि कलात्मक क्षेत्रातील या बहुआयामी यशामुळे एस.एस.पी.एम. कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, कणकवलीच्या गुणवत्तापूर्ण सांस्कृतिक वाटचालीला नवी ओळख मिळाली आहे.विद्यार्थ्यांच्या कलागुणांना योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देत त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्याची संस्थेची परंपरा या यशातून पुन्हा अधोरेखित झाली आहे.