हनुमान जन्मोत्सव निमित्त हनुमान चरणी दहा हजार जोर बैठक

हनुमान जन्मोत्सव निमित्त हनुमान चरणी दहा हजार जोर बैठक

वेंगुर्ला

 

बजरंग बली की जय 
जय हनुमान 
जय श्री राम 
जय भवानी जय शिवाजी 
हर हर महादेव 
भारत माता की जय 
वंदे मातरम 


    च्या जयघोषात प्रतिवर्षीप्रमाणे वेंगुर्ला येथील निसर्गरम्य श्री विरासन हनुमान मंदिर गाडी अड्डा वेंगुर्ला येथे व्ययाम प्रसार अभियान, व्यसन मुक्त अभियान अंतर्गत गाडी अड्डा मित्र मंडळ, विरासन हनुमान मंदिर व्यवस्थापन श्री सातेरी व्ययाम शाळा वेंगुर्ला, युवक शरीर सौष्ठव संवर्धन संस्था वेंगुर्ला, ग्रामस्थ, भाविक यांच्या संयुक्त विद्यमाने व्ययामपटू  अंतरराष्ट्रीय शरीर सौष्ठवपटू श्री. किशोर शांताराम सोन्सूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात पहाटे सहा ते आठ या वेळेत शक्ती देवता हनुमान चरणी एकत्रित दहा हजार जोर बैठक अभिषेक संकल्प पूर्ण करण्यात आला. यावेळी व्ययामपटू, भाविक ग्रामस्थ, स्त्री पुरुष, आदी सहभागी झाले होते. सर्व प्रथम परंपरिक आरती झाली नंतर जोर बैठक अभिषेकला सुरुवात झाली यावेळी वेंगुर्ला येथील वेंगा बॉईज चे सदस्य व व्ययामपटू ग्रामस्थ यांनी सुरुवात केली. श्री सोन्सूरकर यांनी उपस्थित भाविकांना व्ययामाचे महत्व सांगून वॉर्मअप  करवून जोर बैठक कश्या मराव्यात या बाबत मार्गदर्शन केले. प्रत्येक व्ययामपटू ने भाविकांनी एका तासात थांबून थांबून आपल्याला जमतील तसे जोर बैठक काढले. यावर्षी पुरुष सोबत महिलांची उपस्थिती उल्लेखनीय होती. यावेळी शुभेच्छा देणेसाठी दैनिक तरुण भारत सिंधुदुर्ग अवृत्ती मुख्य संपादक शेखर सामंत, डॉ. राजेश्वर उबाळे, डॉ. किशोर धोंड, डॉ. वंदन वेंगुर्लेकर, रोटरी अध्यक्ष श्री आनंद बोवलेकर, राजन गावडे, वसंत तांडेल, पत्रकार सुरेश कौलगेकर, बाळा फोवकांडे, कोरगावकर, मयेकर, नागेश केळजी, सुहास मांजरेकर, केळजी मामा, नित्यानंद आठलेकर, ज्येष्ठ व्ययामपटू महेश वेंगुर्लेकर, प्रकाश प्रभुखानोलकर, शिवदत्त सावंत, पूनम बोवलेकर, संगीता कामत, प्रसाद जाधव, शिल्पा सापळे, मंडळ कार्यकर्ते पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी शेखर सामंत यांनी शक्ती देवता हनुमान चरणी जोर बैठक अभिषेक या संकल्पनेचा कौतुक करून गेली 27 वर्ष सुरु असलेला हा उपक्रम स्तुत्य आहे यासाठी सातेरी व्ययाम शाळा व गाडी अड्डा मित्रमंडळ व मंदिर व्यवस्थापन यांचे अभिनंदन केले. व्यायाम प्रसार अभियान असेच पुढे चालू राहण्यास शुभेच्छा दिल्या. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व भाविकांचे आभार व्यक्त करण्यात आले.