निरामय विकास संस्था सावंतवाडी यांच्या वतीने दाभोली इंग्लिश स्कुल शाळेस शैक्षणिक टॅब भेट.
दाभोली
निरामय विकास संस्था सावंतवाडी यांच्या वतीने दाभोली इंग्लिश स्कुल दाभोली शाळेस शैक्षणिक टॅब भेट देण्यात आले. संस्थेच्या अध्यक्षा डॉ. अनघा सबनीस, उपध्यक्षा सुधाताई सबनीस, सचिव वंदना करंबळेकर, आसावरी बर्वे, अस्मिता सबनीस यांच्या शुभ हस्ते शाळेस चार टॅब प्रदान करण्यात आले. यावेळी पालक शिक्षक संघ उपाध्यक्ष आत्माराम उर्फ बाळू खानोलकर, शाळेचे मुख्यद्यापक किशोर सोनसूरकर, रेश्मा चोडणकर, वसंत पवार आदी मान्यवर उपस्तित होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आपल्या विविध शैक्षणिक उपक्रमात सहभागी असणारी एक उपक्रमशील शाळा म्हणून ओळख निर्माण करणारी जीवन शिक्षण अर्थात जीवन कौशल्य विविध शालेय उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये रुजवणारी दाभोली इंग्लिश स्कुल दाभोली या शाळेस निरामय संस्था सावंतवाडी या संस्थेच्या पदाधिकारी नि शाळेस प्रत्यक्ष भेट दिली व शाळेची माहिती घेतली. यावेळी शाळेमध्ये सुरु असलेल्या विविध उपक्रमांची माहिती शाळेच्या विद्यार्थ्यांनी अतिशय उत्स्फूर्तपणे दिली. शाळेत सुरु असलेल्या तंत्रशिक्षण विभागांतर्गत शेती व बागकाम तंत्रज्ञान, अभियांत्रिकी तंत्रज्ञान, ऊर्जा व पर्यावरण, अन्न प्रक्रिया तंत्रज्ञान या विभागांची माहिती विद्यार्थ्यांनी दिली. या विभागतून विविध प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून तयार केलेल्या वस्तू इत्यादीची माहिती दिली. शाळेची आद्ययवत प्रयोगशाळा व स्मार्ट बोर्डचा वापर दैनंदिन अभ्यासात कसा केला जातो, स्मार्ट बोर्डची हाताळणी व वापर कसा केला जातो याची माहिती विद्यार्थ्यांनी दिली. शाळेतील ओपन एग्रीकल्चर क्लासरूम, देवराई, औषधी वनस्पती उदयान, मिनी आई. टी. आई. उदयान, ग्रंथालय, तसेच शाळेने राबविलेले विविध उपक्रम जसे की न्यूज चॅनेल, चटणी भाकरी महोत्सव, विज्ञान जत्रा, बाल साहित्य संमेलन आदी उपक्रम पाहून मान्यवर भारावून गेले. भविष्यात शाळेच्या विविध उपक्रमांना शुभेच्छा देऊन आणखी तीन टॅब शाळेस जून पर्यंत देण्याचे जाहिर केले. मुख्यद्यापक किशोर सोनसूरकर यांनी शाळेत लवकरच AI बाबत प्रशिक्षण व मार्गदर्शन विशेष वर्ग शाळेत सुरु करण्याबाबत सांगितले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील AI तंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शन करणारी एक शाळा म्हणून लवकरच या शाळेची ओळख निर्माण होईल असे सांगितले. शाळेतील विद्यार्थ्यांनी या टॅबचा वापर करताना स्वतःचे कौशल्य व बुद्धीचा वापर अधिक करून फक्त तांत्रिक बाबतीत गरज वाटल्यास कृत्रिम बुद्धिमातेचा उपयोग विचार पूर्वक करावा असे सांगितले. यावेळी आभार वसंत पवार यांनी मानले.
konkansamwad 
