कै. सौ. एस. आर. पाटील कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावीचा दणदणीत निकाल....विज्ञान-वाणिज्य शाखा १०० %

कै. सौ. एस. आर. पाटील कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावीचा दणदणीत निकाल....विज्ञान-वाणिज्य शाखा १०० %

 

पाट

 

    पाट येथील कै. सौ. सीताबाई रामचंद्र पाटील कनिष्ठ महाविद्यालयाने बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. विज्ञान व वाणिज्य या दोन्ही शाखांचा निकाल 100 टक्के लागला असून, कला शाखेचा निकाल 91.66 टक्के लागला आहे. 

शाखानिहाय टॉपर्स
विज्ञान शाखा - 100% निकाल
66 पैकी 66 विद्यार्थी उत्तीर्ण. 

प्रथम: कु. सामंत अर्पिता अमेय - 83% 
द्वितीय: कु. परब दीक्षा शंकर - 74.83% 
तृतीय: कु. घोगळे शाल्मली शंकर - 74.33% 

वाणिज्य शाखा - 100% निकाल
64 पैकी 64 विद्यार्थी उत्तीर्ण. 
प्रथम:पाटकर अथर्व उत्तम - 82.33% 
द्वितीय:पाटकर रिया राजन - 79.83% 
तृतीय:वझरकर वैभव वासुदेव - 78.67% 

कला शाखा - 91.66% निकाल 
प्रथम:आरोलकर प्रियांका गोविंद - 77.83% 
द्वितीय:परब वेदश्री ज्ञानेश्वर - 59.17% 
तृतीय:पाटील लाडू मधुकर - 56% 

       या दैदिप्यमान यशाबद्दल सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांचे संस्था व विद्यालयाच्या वतीने हार्दिक अभिनंदन करण्यात आले आहे. विज्ञान व वाणिज्य शाखेचा शंभर टक्के निकाल हा विद्यालयाच्या गुणवत्तेचा व विद्यार्थ्यांच्या मेहनतीचा पुरावा असल्याची प्रतिक्रिया शिक्षण क्षेत्रातून व्यक्त होत आहे.