विश्व मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारताला पाच पदके
बँकॉक (थायलंड)
रविवारी झालेल्या विश्व मुष्टीयुद्ध फ्युचर्स चषक २०२६ च्या स्पर्धेत भारताने एकूण ५ पदकांची कमाई केली. या स्पर्धेत भारतीय स्पर्धकांनी १ सुवर्ण, ३ रौप्य आणि १ कास्य पदक घेतले. महिलांच्या ५१ किलो वजन गटात भारताच्या चंद्रीका पुजारीने अंतिम लढतीत उइबेकच्या नेझोकेतचा एकतर्फी पराभव करत सुवर्ण पदकाला पुरूष आणि महिला स्पर्धकांनी गवसणी घातली. भारताच्या १९ वर्षाखालील वयोगटातील या स्पर्धेत दर्जेदार कामगिरी केली आहे. या स्पर्धेमध्ये भारताच्या ३ स्पर्धकांनी रौप्य पदके मिळविली. महिलांच्या ४८ किलो वजन गटातील अंतिम लढतीत इंग्लडच्या स्पर्धकाकडून भारताच्या गुंजनला ०-५ असा पराभव पत्करावा लागल्याने तिला रौप्य पदक मिळाले. तर ५४ किला. वजन गटात अमेरिकेच्या स्पर्धकाने जॉयश्री देवीचा ४-१ अशा गुण फरकाने पराभव केला. पुरूषांच्या ५० किलो वजन गटात युक्रेनच्या स्पर्धेकाने भारताच्या अंबेकर मिताईला पराभूत केल्याने अंबेकरला रौप्य पदक मिळाले. या स्पर्धेत महिलांच्या ५७ किलो वजन गटात भारताच्या राधामणीने कास्य पदक घेतले. सदर स्पर्धा बँकॉकमध्ये ८ ते १५ मार्च दरम्यान झाली.
konkansamwad 
