घरगुती ६० रुपये तर व्यावसायिक सिलिंडर ११५ रुपयांनी महाग.....सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार

घरगुती ६० रुपये तर व्यावसायिक सिलिंडर ११५ रुपयांनी महाग.....सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार

 

नवी दिल्ली

 

    देशभरात घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत ७ मार्चपासून वाढ करण्यात आली आहे. दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नई या देशातील प्रमुख महानगरांमध्ये ६० रुपयांची वाढ झाली आहे. या दरवाढीमुळे दिल्लीत १४.२ किलोच्या एलपीजी सिलिंडरची किंमत आता ९१३ रुपये झाली आहे. यापूर्वी दिल्लीत हा दर ८५३ रुपये इतका होता. १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरची किंमतही आता ११५ रुपयांनी वाढली असून हा दर दिल्लीत १,८८० रुपयांच्या पुढे पोहोचला आहे. एलपीजीच्या किमतीत वाढ झाल्याने सामान्य ग्राहकांच्या स्वयंपाकघरांवर थेट परिणाम होणार आहे.देशातील वेगवेगळ्या शहरांमध्ये एलपीजी सिलिंडरच्या किमतींमध्ये फरक राज्य-विशिष्ट कर आणि व्हॅटमुळे वेगवेगळा असतो. नवीन दरांनुसार, मुंबईत घरगुती सिलिंडरची किंमत ९१२.५० रुपये आहे, तर कोलकातामध्ये ती ९३९ रुपये आहे. चेन्नईतील ग्राहकांना ९२८.५० रुपये मोजावे लागतील. उत्तर प्रदेशातील नोएडामध्ये एलपीजी सिलिंडरची किंमत दिल्लीतील ९१३ रुपयांवरइंडियन ऑइलने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, १४.२ किलोच्या विना-अनुदानित एलपीजी सिलिंडरची किंमत ११ महिन्यांपूर्वी ८ एप्रिल २०२५ रोजी शेवटची वाढ करण्यात आली होती. एप्रिलमध्ये किंमती ५० रुपयांनी वाढवण्यात आल्या होत्या. ३० ऑगस्ट २०२३ नंतर १४.२ किलोच्या विना अनुदानित एलपीजी सिलिंडरची ही सर्वाधिक किंमत आहे. मध्य पूर्वेतील युद्धामुळे गेल्या आठवड्यात आंतरराष्ट्रीय पातळीवर गॅसच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे.व्यावसायिक सिलिंडरही महागघरगुती सिलिंडरप्रमाणेच १९ किलोग्रॅमच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत प्रतिसिलिंडर ११४.५० ने वाढली आहे. त्यानंतर व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत दिल्लीत १,८८३ रुपये, कोलकातामध्ये १,९९० रुपये, मुंबईत १,८३५ रुपये आणि चेन्नईमध्ये २,०४३.५० रुपयांपर्यंत वाढली आहे. गेल्या आठवड्यात झालेली ही दुसरी आणि यावर्षी जानेवारीनंतरची चौथी वाढ आहे. १ मार्च रोजी १९ किलोग्रॅमचा व्यावसायिक सिलिंडर २८ रुपयांनी महागला होता. त्यानंतर आता केवळ सात दिवसात त्यात आणखी ११४.५० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. यावर्षी व्यावसायिक एलपीजी सिलिंडरचे दर ३०२.५० रुपयांनी वाढले आहेत. या दरवाढीमुळे हॉटेलमधील अन्नपदार्थांचे दरही वाढू शकतात.एकीकडे दरांमध्ये मोठी वाढ करतानाच दुसरीकडे गॅस सिलिंडर बुकिंगच्या नियमातही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. यापूर्वीच्या नियमानुसार एलपीजी गॅस बुकिंगसाठी १५ दिवसांचा कालावधी निश्चित करण्यात आला होता. आता ही मुदत २१ दिवसांपर्यंत वाढवण्यात आली आहे. साहजिकच आता दोन गॅस बुकिंगमध्ये किमान २१ दिवसांचे अंतर असणे गरजेचे आहे. त्यामुळे एक सिंलिंडर संपल्यानंतर २१ दिवसांच्या आत पुन्हा एकदा एलपीजी गॅस सिलिंडर बुक करता येणार नाही. एलपीजी गॅसच्या बुकिंगमधील बदल तात्काळ स्वरुपात लागू करण्यात आले आहे. काही कंपन्यांनी याबाबत तत्काळ अंमलबजावणी सुरू केली नसली तरी येत्या काही दिवसात नवीन
नियम लागू होणार आहे.